खापरखेडा-बेर्शिबा मिशन फाँर क्राईस्त चर्च मध्ये नाताळ उत्सहात साजरा

वार्ड नंबर ४, खापरखेडा येथील बेर्शिबा मिशन फाँर क्राईस्त चर्च येथे नाताळ सण मोठ्या उत्सहाने आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी ११:०० वाजता आदरणीय पास्तर फिलिप्स शेमुयअल यांच्या शुभ हस्ते आराधना, प्रवित्रशास्त्र वचन पठन केले. वचनाचे संबोधन करण्यात आले. तसेच प्रभू येशू यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगण्यात आली त्याचप्रमाणें बेर्शिबा चर्चच्या संस्थापक आदरणीय श्रीमती वसंत शेमुयल यांचा सुध्दा आजच वाढदिवस असून सारी कल्याशाने एकमेकांस ख्रिसमसच्या (नाताळ) शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे देशावर आलेले कोरोना चे मोठे संकट तत्काळ नायनाट व्हावे अगोदर जसे देशात सुरू होते प्रेम, सुख, शांती, संपुर्ण लाभो तसेच सर्वानमध्ये एकातमता राहो असे पास्तर आपल्या भाषनात बोलत होते. याप्रसंगी मनोज बोरकर, राजकुमार चवरे, अनिल कनोजे, सुनिल चवरे, विनीत चवरे, सुरज लांबघरे, संजय डोंगरे, जोसफ दास, विक्की मोहबे, अनिल चवरे आदी उपस्थित होते. कोविड-१९ चे तंतोतत काठेकोरपणे पालन करण्यात आले.